जमीन, जुमला, पैसा-अडका, सत्ता, संपत्ती सर्वकाही होतं हो.. संभाजी महाराज केवळ एका राजाचा राजपुत्र नव्हते तर स्वत: राजे होते.. जी वतनदारी हवी होती ती मान्य करून, कोणता ना कोणत्या पद्धतीने औरंगजेबासोबत तह करता आला असताच की! काय कमी होते? पण, गुरुजी म्हणतात तसं शिवछत्रपतींचा छावा कधीही झुकला नाही वाकला नाही अगदीच सांगायचे झाले तर
सोडावा धर्म की सोडावा प्राण
ऐसा प्रश्न कधी ना पडवा ...
सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा
शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा...
हा त्याग, ही इतकी मोठी प्राणाची केवळ शब्दांनी समजणारी नाहीये..त्यासाठी किमान एक महिना एक टक्का यातना सहन करावी लागेल.
पायाला बसणारे चटके, पोटाला पडणारा भुकेचा पीळ अशा लहानशा त्यागातून किमान महाराजांचा मृत्यू किती यातनामयी होता याची जाणीव होईल.
प्राणालाही लाजवेल असा मृत्यू संभाजी महाराजांच्या नशिबी आला.
गुरुजी म्हणतात,
गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांत |
संभाजी धर्म जगले जळत्या राणांत ||
सूर्याहूनी ही अति दाहक धर्मभक्ति |
स्फुरण्यास नित्य धरुयां शिवपुत्र चित्ती ||
कोण म्हणतं हे बलिदान धर्मासाठी झालेले नाही..१०० टक्के हे बलिदान धर्मासाठीच होते.. क्रूर औरंग्याने विचारलेला प्रश्न सत्ता की मृत्यू असा नव्हताच..तर इस्लाम की मौत? असा होता.. आणि राजाने हसत हसत मृत्यू कवटाळला.
गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांत |
संभाजी धर्म जगले जळत्या राणांत ||
सूर्याहूनी ही अति दाहक धर्मभक्ति |
स्फुरण्यास नित्य धरुयां शिवपुत्र चित्ती ||
कोण म्हणतं हे बलिदान धर्मासाठी झालेले नाही..१०० टक्के हे बलिदान धर्मासाठीच होते.. क्रूर औरंग्याने विचारलेला प्रश्न सत्ता की मृत्यू असा नव्हताच..तर इस्लाम की मौत? असा होता.. आणि राजाने हसत हसत मृत्यू कवटाळला.
दोनो पैर कटे शंभू कें | ध्यैय मार्ग सें हटा नही || हाथ कटें तो क्या हूवाॅ | सत्कर्म कभी छूंठा नही ||
शरीरातील रक्त गोठले, डोळ्यात तप्त सळ्या घातल्या, नखे ओढून काढलीत..अंगावरची एकूण एक त्वचा.. जनावराला सोलतात तशी सोलून काढली ओ.. मग हे बलिदान एका दिवसाच्या पुण्यतिथीने स्मरणात राहील का? वडिलांनी वाढवलेले हिंदवी स्वराज्य हे कोणत्याही हिरव्या झालर खाली न आणता धाकल्या धन्याने आपल्या प्राणाची आहुती दिली पण ना धर्म सोडला ना हिंदवी स्वराज्य.
याच असीम त्यागाची आठवण, स्मरण चित्तात ठसावी यासाठी धर्मवीर बलिदान मास. गुरुजी म्हणतात ज्या ज्या गावात सूर्य उगवतो तिथे बलिदान मास पाळलाच पाहिजे. कारण ज्या ज्या गावात सूर्य उगवतो.. ज्या ज्या गावात आज एक जरी हिंदू या धर्तीवर कोणी शिल्लक असेल तर त्याचे श्रेय जाते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाच! अवघ्या लहान वयात मातृछत्र हरवलेले संभाजी महाराज यांनी भारतमातेला आपली आई मानले.
भारतमाता, गोमाता, धरणीमाता, वेदमाता अशा कितीतरी माता आपल्या स्वराज्यात नांदत असताना हे मातृछत्र हरपले तर आपले हिंदवी स्वराज्य पोरके होईल. या पोरकेपणाची जाणीव असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र देह त्यागून हिंदू धर्माला पोरके केले नाही. ही जाणीव चित्तात ठेवून अखंड हिंदुस्थानने गुरुजीनी सांगितलेला धर्मवीर बलिदान मास पाळावा.
नक्कीच तुम्हाला या एका महिन्यात केवळ राजांसाठी श्रद्धांजली वाहण्याचे समाधान मिळेलच पण यासोबतच एका नव्या जगण्याचा अर्थ उमगेल. यंदाचा बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच आंगल् दिनांक २८ फेब्रुवारी ते २९ मार्च.
- नेहा रोहितराव तांबे
0 Comments